क्राईम, चोपडा

चोपडा येथे सात हजारांचा गांजा आढळला

शेअर करा !

ganja

चोपडा, प्रतिनिधी | येथील धरणगाव रस्त्यावर अग्रवाल पेट्रोल पंपासमोर बेवारस बॅग आढळून आली असून त्यात सुमारे सात हजार रुपये किमतीचा गांजा आढळून आला आहे.

  • Sulax 1
  • advt tsh flats
  • spot sanction insta

 

पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहीती अशी की, आज (दि.१३) दुपारी ३:३० वाजता रस्त्याच्या बाजूला गवतात एक लाल रंगाची बेवारस बॅग आढळून आली. याबाबत येथील शहर पोलीस स्टेशनला वेले येथील विश्वास वसंत सपकाळे यांनी कळविले असता पोलीस नाईक प्रदीप राजपूत व मधुकर पवार यांनी घटनास्थळी जाऊन ती बॅग हस्तगत केली. त्यात सुमारे सात किलो गांजा हा अंमली पदार्थ आढळून आला. सपोनि मनोज पवार, हवालदार मधुकर पवार, सुनील पाटील, पोलीस नाईक रवींद्र पाटील, प्रदीप राजपूत यांनी त्याचा पंचनामा केला. शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.