अमळनेर, सामाजिक

समाधी सोहळयाचा मंडप वादळामुळे कोसळला

शेअर करा !
वाचन वेळ : 2 मिनिट

WhatsApp Image 2019 04 15 at 3.27.12 PM

अमळनेर (प्रतिनिधि)  येथील संत सखाराम महाराज संस्थानतर्फे द्विशताब्दी समाधी सोहळ्यासाठी बोरी नदीपात्रातील भव्य मंडप रविवार १४ एप्रिल रोजी झालेल्या वादळी वाऱ्याने   कोसळला. सोहळा अवघ्या ८ दिवसांवर आलेला असतांना गेल्या २ महिन्यांपासून या भव्य मंडपाची केलेली ऊभारणी निसर्गाच्या अवकृपेने क्षणात कोसळल्याने भविकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

  • advt tsh 1
  • new ad
  • vignaharta
  • advt atharva hospital
  • Online Add I RGB

 

हा सोहळा २१ ते २९ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आला असून त्यासाठी अमळनेर येथील वाडी संस्थानातर्फे जय्यत तयारी सुरू झाली होती. या सोहळ्याला  मोठ्या प्रमाणावर भाविक येणार असल्याने त्यासाठी नदीपात्रात भव्य पारायणं मंडप, महायज्ञ कुंड, भक्त निवास तसेच विविध सोयी सुविधा, लाकडी दांड्या बांबूच्या सहाय्याने आकर्षक मंडप ऊभारला होता. मात्र रविवारी रात्री झालेल्या वादळात तो कोलमडून पडला.  आता नविन मंडप ऊभारणीसाठी वेळही नाही. मात्र त्यावर मात करण्यासाठी भविक सरसावले आहेत. मंदिरापासून नदीपात्रात उतरतांना डाव्या हाताला १०८ विष्णु पंचायतन यज्ञकुंड समाधी मंदीरासमोर कीर्तन संकुल यज्ञकुंडाच्या पुढील भागात भागवत कथा गाथा पारायण, उजव्या हाताला भोजन कक्ष, समाधीमागे ,निवास व्यवस्था तर फरशीपूल भागाकडे फिरते शौचालय व स्नानगृह अशी तयारी जोरात सुरू झाली होती. श्री सद्रु सखाराम महाराज यांच्या समाधीस इसवी सन १८१८ ते २०१८ असा दोनशे वर्षांचा प्रदीर्घ काळ पूर्ण झाला म्हणून २०१८ हे त्यांच्या समाधी सोहळ्याचे २०० वे वर्ष विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरे करण्यासाठी जय्यत तयारी सुरू होती.  श्री सद्गुरु सखाराम महाराज अमळनेर संतपीठाचे विद्यमान गादीपती सद्गुरु श्री प्रसाद महाराज यांच्या प्रयत्नाने समस्त भक्त भाविकांच्या सहकार्याने चैत्र वद्य प्रतिपदा २० ते २९ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

२२ ते २८एप्रिल दरम्यान आयोजन

१०८ कुंडी विष्णू पंचायतन महायज्ञ- २२ एप्रिल ते २८एप्रिल दरम्यान होणार असून २९ रोजी काल्याचे कीर्तन होऊन  उत्सवाची सांगता होईल. गाथा पारायण-कमीत कमी ५००० पारायणकर्ते या कार्यक्रमात परायणास बसणार असून २० ते २९ एप्रिल वेळ सकाळी सहा ते बारा या कालावधीत ही गाथा पूर्ण होणार आहे. यासाठी हा भव्य मंडप ऊभारला होता यासोहळ्याला राज्यभरातील वारकरी संप्रदायाचे सर्व संत उपस्थित राहणार असून या संमेलनात सहभागी होणार आहेत.  मात्र मंडप कोसळल्याने भाविकांच्या आनंदावर विरजण पडले असून हिरमोड झाला अस ला तरी भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही यासाठी भक्तगण सरसावले आहेत.