क्रीडा, राज्य, राष्ट्रीय

पहिल्याच फेरीत सायनाचा पराभव

शेअर करा !

saina

मुंबई वृत्तसंस्था । सायना नेहवाल आणि समीर वर्मा या भारतीय बॅडमिंटनपटूंचे आव्हान हाँग काँग ओपन स्पर्धेतील पहिल्याच फेरीत संपुष्टात आलेलं आहे. आठव्या मानांकित सायनाला चीनच्या कै यान यान ने १३-२१, २०-२२ अशा दोन सेट्समध्ये पराभूत केले आहे.

  • Sulax 1
  • spot sanction insta
  • advt tsh flats

पुरुषांमध्ये १६ व्या मानांकित समीर वर्माचं आव्हान चीन तैपेईच्या वँग त्झू वईने अवघ्या ५४ मिनीटात परतवून लावलं. पहिल्याच फेरीत पराभव स्विकारावा लागण्याची समीरची ही तिसरी वेळ ठरली आहे. सायनाने आपल्या चिनी प्रतिस्पर्ध्याला कडवी टक्कर देण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा निभाव लागला नाही. दुसऱ्या सेटमध्ये सायनाने आपल्या प्रतिस्पर्ध्याला झुंज दिली, मात्र इथेही तिचे प्रयत्न तोकडेच पडले. समीर वर्माही आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूच्या आव्हानाचा सामना करु शकला नाही.