जळगाव, सामाजिक

रोटरी मिडटाऊनच्या अध्यक्षपदी डॉ.उषा शर्मा यांची नियुक्ती

शेअर करा !
वाचन वेळ : 2 मिनिट

rotary news

जळगाव प्रतिनिधी । येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊनच्या अध्यक्षपदी डॉ.उषा शर्मा यांची तर मानद सचिवपदी डॉ. विवेक वडजीकर यांची रोटरी वर्ष 2019-20 करिता निवड करण्यात आली आहे.

  • advt atharva hospital
  • vignaharta
  • Online Add I RGB
  • advt tsh 1
  • new ad

 

डॉ.उषा शर्मा यांनी आकाशवाणी जळगाव केंद्रात ज्येष्ठ निवेदिका म्हणून 33 वर्षे कार्य केले आहे. त्या कवयित्री व साहित्यिक असून त्यांचे काव्य व कथा संग्रह प्रकाशीत आहेत. त्यांच्या कार्याचा अहिल्याबाई होळकर व महाराष्ट्र शासनाचा साहित्य अकादमी पुरस्काराने गौरव झाला आहे. 2014 पासून शर्मा या रोटरीत सक्रीय असुन त्यांनी मानद सचिव पदाची यशस्वी धुरा सांभाळल्याबद्दल त्यांना ‘बेस्ट सेक्रेटरी’ पुरस्कार लाभला आहे. ‘आम्ही मैत्रिणी’ कॅन्सर सर्पोर्ट गु्रपच्या माध्यमातून त्या सामाजिक उपक्रमात कार्यरत आहेत. डॉ. वडजीकर एम.डी. आयुर्वेद असून रोटरीत अनेक वर्षापासून विविध जबाबदार्‍या त्यांनी सांभाळल्या आहेत.

रविवारी पदग्रहण सोहळा
रविवार 14 रोजी सायंकाळी 7.30 वा. हॉटेल रॉयल पॅलेसच्या सभागृहात नुतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट शब्बीर साकीर यांची प्रमुख वक्ते म्हणून तर प्रमुख अतिथी म्हणून सहप्रांतपाल डॉ.तुषार फिरके यांची उपस्थिती लाभणार असल्याचे मावळते अध्यक्ष किशोर सुर्यवंशी व मानद सचिव मनोज पाटील यांनी कळविले आहे.