क्रीडा, राज्य

रांची येथील तिसऱ्या कसोटीत रोहितचे खणखणीत शतक

शेअर करा !

rohit sharma

 

रांची वृत्तसंस्था । रांची येथे आजपासून सुरू झालेल्या भारत विरुध्द दक्षिण आफ्रिकेचे तिसऱ्या कसोटीतील पहिल्याच डावात रोहितने खणखणीत शतक ठोकले आहे. रोहितचे चालू सामन्यातील तिसरे तर, कारकिर्दीतील सहावे कसोटी शतक आहे.

  • FB IMG 1572779226384
  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून मालिका खिशात घातल्यानंतर आज भारतीय संघ आत्मविश्वासनं मैदानात उतरला होता. मात्र, सलामीवीर मयाकं अग्रवाल अवघ्या १० धावा करून तंबूत परतला. त्यानंतर आलेला चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला. तर, कर्णधार विराट कोहलीही १२ धावा करून परतला. त्यामुळं एकेवेळी भारताची अवस्था ३ बाद ३९ अशी झाली होती. एका बाजूला अशी पडझड होत असताना दुसऱ्या बाजूनं रोहितनं किल्ला लढवत शतक साकारलं. १३० चेंडूंमध्ये त्यानं हे शतक साजरं केलं. त्यात चार षटकार आणि १३ चौकारांचा समावेश होता. अजिंक्य रहाणेनं त्याला उत्तम साथ दिली. रोहित आणि रहाणेच्या भागीदारीच्या जोरावर भारतानं २०० धावांचा टप्पा ओलांडला आहे.