क्राईम, जळगाव, रावेर

सेवानिवृत्त सहाय्यक फौजदाराचा पत्नीसह आत्मदहनाचा प्रयत्न (व्हिडीओ)

शेअर करा !

faujdar shaikh shakil

जळगाव, प्रतिनिधी | भुसावळ येथील सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार शेख शकील शेख दगू यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पत्नीसह येवून आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे.

advt tsh 1

 

अधिक माहिती अशी की, शेख शकील शेख दगू यांनी एका निवेदनाद्वारे दिलेल्या तक्रारीनुसार म्हटले आहे की, सेवानिवृत्त झाल्यानंतर मी समाजसेवेसाठी य गोरगरीबांना न्याय मिळण्यासाठी शिवसेना या राजकीय पक्षात प्रवेश करुन जनतेची सेवा करीत आहे. मात्र फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे आणि फैजपूर पोलीस स्टेशनचे पी.एस.आय.

जिजाबराव पाटील हे आपणास मानसिक त्रास देत असून खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकण्याची धमकी देत आहेत. मध्यंतरी फैजपूर शहरात माझ्यावर गुंडांनी प्राण घातक हल्ला करुन मला मारहाण केली आहे. मी त्यांच्याविरुध्द फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखला झालेला आहे. मात्र आरोपींना अटक न करता उलट डीवायएसपी पिंगळे यांनी त्यांच्याशी हात मिळवणी करुन माझ्यावर व माझ्या परिवारावर संगनमताने खोटा गन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी त्यांच्या त्रासाला कंटाळून पत्नीसह आत्मदहन करीत असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. तसेच सीबीआय व ई.डी.मार्फत त्वरीत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे.