क्राईम, जळगाव

जळगावच्या रायसोनी नगरात तरुणाची आत्महत्या

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट
be0c05a5 6228 491b 88bc 3bd682585701
 

जळगाव प्रतिनीधी |शहरातील रायसोनी नगरातील एका 22 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (बुधवार) सकाळी उघडकीस आली आहे.

  • Online Add I RGB
  • new ad
  • advt atharva hospital
  • advt tsh 1
  • vignaharta

 

नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निलेश मधुकर सपकाळे (वय 22, रा. रायसोनी नगर)  हा हात मजुरीचे काम करत होता. नुकताच त्याने प्रेमविवाह केला होता. प्रेम विवाह करुन देखील पत्नी घरी येत नसल्याने नातेवाईकांनी मंगळवारी 9 जुलै रोजी रामानंदनगर येथे राहत असलेल्या पत्नीच्या घरी जाणून तिची समजूत काढली. पंरतू समजून काढून देखील पत्नी घरी येत नसल्यामुळे निलेश निराश होता. या नैराश्यातून आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास राहत्या घरात वरच्या मजल्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. मयत निलेशच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे. या घटनेबाबत काका शांताराम बाबुराव सपकाळे यांच्या खबरीवरून रामानंदनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास मनोज इंद्रेकर करीत आहे.