भुसावळ, राजकीय

‘एआयएमआयएमम’ कडुन भुसावळातून नगरसेवक रवींद्र सपकाळे इच्छुक

शेअर करा !

aimim umedvari

भुसावळ प्रतिनिधी । आगामी विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएम पक्षाकडून नगरसेवक रवींद्र सपकाळे यांनी उमेदवारीसाठी प्रस्ताव सादर केला आहे.

  • spot sanction insta
  • advt tsh flats
  • Sulax 1

आगामी विधानसभा निवडणुकीत भुसवाल मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून घटक पक्ष असलेल्या दि ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादऊल मुसलमीन म्हणजेच एआयएमआयएम या पक्षाकडून उमेदवारी मिळावी म्हणून नगरसेवक रवींद्र बळीराम सपकाळे यांनी पक्ष संघटनेकडे उमेदवारीसाठी विहित नमुन्यातील अर्ज देत प्रस्ताव सादर केला. एमआयएम पक्षाकडून ४ पासून १० ऑगस्ट पर्यंत इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्विकारण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.त्यानुसार पक्षाचे रावेर लोकसभा प्रभारी फ़िरोज़ शेख यांच्याकडे रवींद्र सपकाळे यांनी आपला अर्ज सादर केला.

य वेळी फिरोज रहेमान शेख यांच्या सोबत महासचिव मुजाहिद शेख,भुसावल शहराध्यक्ष अशरफ तडवी,सचिव कलिम शेख हे रवींद्र सपकाळे यांच्या उमेदवारीचा अर्ज सादर करतांना उपस्थित होते.