क्राईम, रावेर

रावेरमध्ये बँक सुरक्षा, उपाय-योजना मार्गदर्शन

शेअर करा !

raver bank

रावेर प्रतिनिधी । येथील पोलीस स्टेशनला शहरातील सर्व बॅक व्यवस्थापकांची निबोंल येथील विजया बँक दरोडा पडलेल्या घटनेच्या अनुषंगाने आज (दि. 24 जून) रोजी बैठक घेण्यात आली आहे.

  • advt tsh flats
  • spot sanction insta
  • Sulax 1

याबाबत माहिती अशी की, बँक व्यवस्थापकांना बँक सुरक्षिकते बाबत मार्गदर्शन देण्यात आले आहे. बँकेत सीसीटीव्ही कॅमेरे, अलार्म तसेच शस्त्रधारी सुरक्षा रक्षक ठेवण्यात यावे. त्याचबरोबर सीसीटिव्हीच्या नजरेत रस्त्यांचा समावेश करण्यात यावा. तसेच गुन्ह्या संदर्भात येणारे खातेदारकडून माहिती हस्तगत करून पोलिसांना देणे, या बाबत सुचना देण्यात आल्या. व सतर्क राहण्याच्या सूचना रावेर पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी दिल्या आहेत. यावेळी एक्सिस बँक मॅनेजर दिपक पाटील, युनियन बँक मॅनेजर शशिकांत पाटील, देना बँक मॅनेजर प्रवीण बोरोले, रावेर पीपल्स बँक मॅनेजर प्रकाश पाटील, स्टेट बँक व्यवस्थापक एस.जी.रानवले, सेंट्रल बँक ऑफ इंडिया व्यवस्थापक राजेश कुमार, जळगाव जनता बँक व्यवस्थापक अनिल बंब, आयसीआयसीआय बँक व्यवस्थापक ऋषिकेश गव्हाणकर, बँक ऑफ महाराष्ट्रचे सुनील कुमार, कॅनरा बँकेचे जी.वी. भालेराव, बुलढाणा अर्बन बँक, जळगाव पीपल बँकेचे श्रीपाद जोशी, एचडीएफसी बँकेचे नरेंद्र परदेशी, यासह शहरातील बँकांचे व्यवस्थापक बैठकला उपस्थित होते.