क्राईम, राजकीय, रावेर

रावेर येथे वाहन तपासणी मोहिमेत २९ लाख रुपयांची रोकड जप्त

शेअर करा !

raver news

रावेर प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोरवड बेरियर नाक्याजवळ वाहन तपासणी मोहिमेत आज दुपारी बसमध्ये 29 लाख 15 हजार रूपयांची रोकड आढळल्याने खळबळ उडाली आहे.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

याबाबत माहिती अशी की, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चोरवड चेकपोस्टवर स्थिरपथक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, बॉर्डर चेक पोस्ट पथकांकडून वाहनांची तपासणी सुरू आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास बऱ्हाणपूरकडून आलेल्या बस क्र. (एमपी ०९ एफए ३२७५) या मध्यप्रदेश परिवहन विभागाच्या बसमध्ये मोहम्मद शाहजाद (वय-२५) रा. अस्थी मार्ग, खंडवा याजवळ २९ लाख १५ हजाराची रोकड मिळून आल्याने, या युवकाला निवडणूक विभागाने ताब्यात घेतले. त्याची कसुन चौकशी सुरु आहे. सदरील रोकड भुसावळ येथील व्यापाऱ्याला देण्यासाठी जात असल्याची माहीती शाहजाद याने इन्कम टॅक्स अधिकाऱ्याना दिली आहे.