क्राईम, जळगाव, रावेर

रावेर येथे पाय घसरून जखमी झालेल्या वृध्दाचा मृत्यू

शेअर करा !

Crime

जळगाव प्रतिनिधी । रात्रीच्या सुमारास गुरे चारत असतांना पाय घसरून डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रावेर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

advt tsh 1

मिळालेल्या माहितीनुसार, नहाळू रामलाला भिलाला (वय-65) रा. मंगरूळ ता.रावेर हे रात्री 10 वाजता म्हशी व गुरे चारण्यासाठी गेले. रात्री अंधार असल्याने त्यांचा पाय घसरल्याने पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. रात्री 11.30 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. वैद्यकिय अधिकारी डॉ. आकाश चौधरी यांच्या खबरीवरून रावेर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला. प्राथमिक तपास अनिल फेगडे करीत आहे.