क्राईम, भुसावळ, राजकीय

खरात परिवारातील सदस्यांच्या अंत्यविधीसाठी केंद्रीय मंत्री आठवले येण्याची शक्यता

शेअर करा !
ravindra kharat bhusawal
रवींद्र बाबूराव खरात

भुसावळ (प्रतिनिधी) भाजपचे नगरसेवक रवींद्र खरात, त्यांचे बंधू सुनील बाबूराव खरात व मुलगा प्रेमसागर आणि रोहित खरात या चौघांवर आज दुपारी ५ वाजेच्या सुमारास एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे अंत्यसंस्कारासाठी येणार असल्याचे वृत्त आहे. परंतू प्रशासानाकडून याबाबत अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

 

या संदर्भात अधिक असे की, काल रात्री पावणेदहाच्या सुमारास रवींद्र बाबूराव खरात यांच्या कुटुंबावर हल्ला चढविण्यात आला. यात स्वत: रवींद्र बाबूराव खरात, त्यांचे बंधू सुनील बाबूराव खरात, मुलगा प्रेमसागर मुलगा रोहित आणि सुमीत गजरे हे ठार झाले आहेत. तर ऋत्वीक या मुलासह पत्नी आणि दोन जण गंभीर जखमी झालेले आहेत. दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी पहिल्यांदा सुनील बाबूराव खरात यांच्यावर गोळीबार करून गुप्तीने वार केले. हा आवाज ऐकून रवींद्र खरात आणि त्यांचे कुटुंबिय घराबाहेर आले असतांना हल्लेखोरांनी त्यांच्याकडे मोर्चा वळविला. यात रवींद्र खरात यांच्यावर घराजवळ गोळीबार करण्यात आला. तर त्यांची मुले जीव वाचवण्यासाठी पळाली असतांना आरोपींनी त्यांचा पाठलाग करत रेल्वे हॉस्पीटलजवळ त्यांनाही गाठत ठार मारले. दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे अंत्यसंस्कारासाठी येणार असल्याचे वृत्त आहे. परंतू प्रशासानाकडून याबाबत अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही.