चाळीसगाव, सामाजिक

छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त कार्यक्रम

शेअर करा !

shahu maharaj

चाळीसगाव प्रतिनिधी । येथे कास्ट्राईब शिक्षक संघटना नाशिक विभाग अंतर्गत आयोजित राजश्री शाहू महाराज जयंती व श्री शिवाजी जाधव यांच्या सेवापूर्ती निमित्त जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम (दि. 26 जून) बुधवार रोजी सायंकाळी 7 वाजता राजपूत मंगल कार्यालयात होणार आहे.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

माहिती अशी की, प्रा. यशवंत गोसावी, पुणे हे सामाजिक समता व आजची परिस्थिती या विषयावर बोलणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सुरेश तांबे (मंत्रालय विभाग प्रमुख अति.सरचिटणीस कास्ट्राईब महासंघ महाराष्ट्र राज्य), रविंद्रजी पालवे (कार्याध्यक्ष कास्ट्राईब महासंघ महाराष्ट्र राज्य) तसेच प्रभाकरजी पारवे (विभागीय अध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना) हे उपस्थित राहणार असून, जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार येथील जिल्हाध्यक्ष शिक्षक संघटना व महासंघ यांनी उपस्थित रहावे, अशी नम्र विनंती आयोजक कडून करण्यात आली आहे.