एरंडोल, धरणगाव, राजकीय

पद्मालय येथे पुष्पाताई महाजन यांच्या प्रचाराचे नारळ फोडले ; परिवर्तन घडविण्याचे मान्यवरांचे आवाहन

शेअर करा !

645625f2 4ed2 4d6e 9dce 0b3ce300ffca

धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव ग्रामिण मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉग्रेस , कॉग्रेस व रिपाई आघाडीचे अधिकृत उमेदवार पुष्पाताई ज्ञानेश्वर महाजन यांच्या प्रचाराचा नारळ श्री श्रेत्र पद्मालय येथिल गणपती मंदिरात आघाडीच्या मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या उपस्थितीत फोडण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी जळगाव ग्रामिणच्या परिवर्तनासाठी सज्ज व्हा, असे आवाहन केले.

  • FB IMG 1572779226384
  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

 

यावेळी मतदार संघातील ईडा.. पिडा टळो .. व परिवर्तन होवून बळीराजाचे राज्य येवो , असे साकडे मान्यवरांनी प्रभू श्री गणरायास घातले . या प्रसंगी उमेदवार पुष्पाताई महाजन , कॉग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, प्रदेश सरचिटणीस डी.जी. पाटील, धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, जिल्हा बॅकेचे संचालक संजय पवार, माजी संचालक वाल्मिक पाटील, युवानेते विशाल देवकर, मंगलाताई पाटील, अरविंद मानकरी यांच्यासह मतदार संघातील सर्वच सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते , महिला पदाधिकारी , युवा वर्ग , विविध गावांचे सरपंच , उपसरपंच ,मान्यंवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थितीत होते.