क्राईम, यावल

यावल येथे मोटर सायकलच्या डिक्कीतून पैसे चोरतांना चोरटे सीसीटीव्हीत कैद  (व्हिडिओ)  

शेअर करा !

WhatsApp Image 2019 09 09 at 8.31.02 PM

यावल, प्रतिनिधी | येथील बुऱ्हाणपुर अंकलेश्वर राज्य मार्गावर असलेल्या एका व्यापारी संकुलनात खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्याच्या मोटरसायकल डीक्कीतुन एक लाख रुपये काढुन चोरटे पसार झाल्याची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

advt tsh 1

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अट्रावल तालुका यावल येथील राहणारे शेतकरी व सेवानिवृत जमादार विजय मधुकर बाविस्कर (वय ५९ वर्ष) हे आज ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शेतातील काम करणारे मजुरांची मजुरी देण्यासाठी यावल येथील स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या शाखेत आपल्या खात्यातून १ लाख रुपयांची रक्कम काढली.  ती रक्कम त्यांनी आपल्या जवळ असलेल्या मोटरसायकल (क्रमांक एम.एच. १९ – ८११०)च्या डिक्कीत ठेतुन  दुपारी १ वाजेच्या सुमारास बसस्थानक परिसरात बुऱ्हाणपुर अंकलेश्वर मार्गावरील असलेल्या जे.टी. महाजन व्यापारी संकुलनातील गुरूनानक या स्टोअर्सवर काही शेती साहीत्य खरेदीसाठी गेले.  पुर्वीपासुन त्यांच्या मागावर असलेल्या तिन चोरटयांनी शिताफीने त्यांच्या  मोटरसायकलची डीक्की  क्षणात तोडुन त्यातील १  लाख रुपये घेवुन पोबारा केला.  त्या चोरटयांनी केलेली चोरी ही घटना मात्र संकुलनाच्या विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या सिसिटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या चोरीच्या घटनेचा गुन्हा दाखल करण्याचे काम यावल पोलीस स्टेशनला सुरू होते.