राजकीय, राष्ट्रीय

पंतप्रधान मोदींचे मंत्रिमंडळ ठरले ; ‘हे’ ४७ खासदार घेणार मंत्रीपदाची शपथ

शेअर करा !

PMNarendraModi

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीतील भव्यदिव्य विजयानंतर नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. याचवेळी मंत्रिमंडळाचाही शपथविधी होणार आहे. आज सायंकाळी 4.30 वाजता मोदी या खासदारांना भेटणार असून त्यांच्याशी चहापानासह चर्चा करणार आहेत. आज शपथ घेणाऱ्या ४७ मंत्र्यांची नावे समोर आली आहेत. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी या खासदारांना फोन करून उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

  • advt atharva hospital
  • advt tsh 1
  • Online Add I RGB

आज सकाळपासून मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. कालपासून अनेक खासदारांची नावे चर्चेत होती. परंतू आता आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची अंतिम यादी समोर आली आहे. यापैकी बहुतांश मंत्र्यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन करून कळवण्यात आले आहे. यावरून आज राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात ५० खासदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. प्रत्येक घटकपक्षाला एक-एक मंत्रीपद मिळणार, अशी चर्चा सुरु होती. मात्र, शेवटच्या क्षणी यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्यानुसार शिवसेना आणि जदयूला प्रत्येकी दोन, तर अकाली दल, लोक जनशक्ती पक्ष आणि अण्णाद्रमुकच्या वाट्याला प्रत्येकी एक मंत्रिपद येऊ शकते. आज शपथ घेणारे मंत्री दुपारी साडेचार वाजत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील.

आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची यादी खालीलप्रमाणे

 

अर्जुनराम मेघवाल, जितेंद्र सिंह, रामदास आठवले, किशन रेड्डी, राम विलास पासवान, सुरेश अंगड़ी, पीयूष गोयल, प्रह्लाद जोशी, मुख्‍तार अब्‍बास नकवी, धर्मेंद्र प्रधान,हरसिमरत कौर, बाबुल सुप्रियो, सुषमा स्‍वराज, स्‍मृती ईरानी, निर्मला सीतारमण, प्रकाश जावड़ेकर, रविशंकर प्रसाद, रमेश पोखरियाल निशंक, प्रल्हाद पटेल, कैलाश चौधरी,थावरचंद गहलोत, किशन पाल गुर्जर, साध्‍वी निरंजन ज्‍योति, किरन रिजिजु, नरेंद्र तोमर, सदानंद गौड़ा,आरसीपी सिंह (जनता दल यूनाइटेड), पुरुषोत्‍तम रुपाला, गजेंद्र शेखावत,अनुप्रिया पटेल, राव इंद्रजीत, संजीव बालियान, अरविंद सावंत, रावसाहेब दानवे,नित्यानंद राय, नितीन गडकरी, संजय धोत्रे, रामविलास पासवान,अनुप्रिया पटेल,रामनाथ ठाकूर,सोम प्रकाश,राज्यवर्धन राठोड, सुषमा स्वराज,गजेंद्र सिंह शेखावत,अर्जुन मुंडा,देबश्री चौधरी,कैलाश चौधरी