क्रीडा, राज्य, राष्ट्रीय

राष्ट्रपतींच्या हस्ते प्रभात कोळीला तेन्झिंग नॉर्गे राष्ट्रीय पुरस्कार

शेअर करा !

prabhat koli

मुंबई प्रतिनिधी । अमेरिका, युरोप, दक्षिण आफ्रिका, आशियातील जवळपास सगळे प्रमुख समुद्र आणि सामुद्रधुनी पोहून जाणाऱ्या २० वर्षीय प्रभात कोळीच्या या कामगिरीची दखल अखेर केंद्र सरकारने घेतली असून त्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडादिनी तेन्झिंग नॉर्गे हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे.

advt tsh 1

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या २०व्या वर्षी प्रभातने जगातील सात आव्हानात्मक समुद्रांपैकी सहा समुद्र पोहून पार केले आहेत. इंग्लिश खाडी (३६ किमी, १३ तास १४ मि. २०१५), कॅटलिना (अमेरिका, ३४ किमी, १० तास १३ मि. २०१६), कैवी (हवाई, ४२ किमी, १७ तास २२ मि. २०१७), सुगारू खाडी (जपान, ३० किमी, ९ तास ५२ मि. २०१७) नॉर्थ चॅनल (नॉर्थ आयर्लंड, ३४ किमी, २०१८), स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर (स्पेन, १५.२ किमी, ४ तास २२ मि. २०१९) असा त्याचा सागरी जलतरणातील अभिमानास्पद प्रवास आहे. त्यातील कैवी आणि सुगारू चॅनल पोहताना त्याने तरुण आणि वेगवान जलतरणपटू म्हणून स्वतःचा ठसा उमटविला आहे. नॉर्थ चॅनल पोहोणारा तो जगातील सर्वात लहान आणि आशियातील वेगवान जलतरणपटू ठरला आहे. आता सात समुद्र ओलांडण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्याला कूकची सामुद्रधुनी पार करायची आहे. पुढील वर्षी २२ किमीची ही सामुद्रधुनी पार करण्याचे आव्हान पेलण्यासाठी तो न्यूझीलंडला जाणार आहे. इंग्लंडच्या मेंबर ऑफ ब्रिटिश एम्पायर किताबाच्या मानकरी असलेल्या सॅलीमेंटी ग्रॅव्हीट यांच्या मार्गदर्शानुसार प्रभात खुल्या पाण्यात पोहण्याचा सराव करतो. गेल्यावर्षी त्याने प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज केला होता. पण त्याला हा पुरस्कार मिळाला नाही. यावेळी थेट केंद्राचाच पुरस्कार मिळाल्यामुळे राज्य शासनही प्रभातच्या या कामगिरीची दखल घेईल अशी अपेक्षा आहे. आता अमेरिकेच्या मॅरेथॉन स्वीमिंग फेडरेशनने निश्चित केलेल्या सात आव्हानात्मक समुद्रातील सातवा समुद्र ओलांडण्यासाठी प्रभात सज्ज आहे.