क्राईम, जळगाव

प्रसुती वेदना असह्य; महिलेचा बाळासह मृत्यू

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

Brain Dead pregnant woman

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील भादली खूर्द येथील 25 वर्षीय गरोदर महिलेचा प्रसुतीपुर्वी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 9.30 वाजेपुर्वी झाली. याबाबत तालुका पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Akshay Trutiya

मिळालेल्या माहितीनुसार, मिना अकिस बारेला (वय-25) रा. भादली खुर्द ह.मु. गौऱ्या पाड, शिरपूर, ह्या गरोदर असल्याने माहेरी भादली येथे आल्या होत्या. आज बुधवारी सकाळी 9.30 वाजेपुर्वी प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यासाठी रूग्णवाहिकेने आणत असतांना त्यांची प्राणज्योत मालविली. पोटातीलत्यांची ही प्रसुती पहिलीच होती. महिलेच्या मृत्यूने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत ग्रामीण पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.