राष्ट्रीय

मोदी मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर

शेअर करा !

नवी दिल्ली वृत्तसंस्था । नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातील खातेवाटप जाहीर करण्यात आले असून यात अत्यंत महत्वाचे असणार्‍या गृहमंत्रीपदाची जबाबदारी अमित शाह यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

  • advt tsh 1
  • advt atharva hospital
  • Online Add I RGB

कालच नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळाने शपथ घेतली होती. यानंतर आज खातेवाटप करण्यात आले. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे अमित शाह यांना गृहमंत्रीपद देण्यात आले आहे. या माध्यमातून त्यांचे मंत्रीमंडळातील स्थान हे दुसर्‍या क्रमांकाचे राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर माजी गृहमंत्री राजनाथसिंग यांना संरक्षण मंत्रीपद देण्यात आलेले आहे. तर जेटलींच्या अर्थमंत्रीपदाच्या खात्याची जबाबदारी निर्मला सितारामन या सांभाळणार आहेत. नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांची खाती बदलण्यात आलेली नाहीत.