क्राईम, चोपडा

पोलीस पाटलांनी पकडला खुनातील फरार आरोपी

शेअर करा !

aaropi

धानोरा प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील धानोरा येथे (दि.९ जून) रोजी चाकूने खुन करुन आरोपी फरार झाला होता. त्यास आज (दि.13) रोजी पोलीस दिनेश पाटील यांनी सकाळी आरोपीस अटक केली आहे.

advt tsh 1

या संदर्भात माहिती अशी की, देवझिरी येथिल पिंटू किर्ता बारेला याने दिपक बजा-या पावरा याचा चाकुने खुन करुन पडून गेला होता. ही घटना (दि.९) रोजी घडली होती. पोलिस आरोपी पिंटू बारेला याचा शोध घेत असतांना धानोरा येथिल पोलिस दिनेश पाटील यांना गुप्त माहीतीवरुन आज दि. १३ रोजी सकाळी सहा वाजेला आरोपीस एका शेतातुन अडावद पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे. म्हणून लवकरच पोलिस पाटील यांना संघटनेकडून गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष भगवान सोनारकडून देण्यात आली आहे. यावेळी त्यांच्यासोबत अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा सचिव प्रशांत सोनवणे हे देखिल उपस्थित होते.