जळगाव, सामाजिक

पिंपळगाव येथे विष घेवून तरूणाची आत्महत्या

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

pimpalgaon news

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील पिंपळगाव येथे 29 वर्षीय तरूणाने विष घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पाचोरा पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. याबाबत माहिती अशी की, राजेश कडुबा ढाकरे (वय-29) रा. पिंपळगाव हरे. ता.पाचोरा जि.जळगाव भडगाव रस्त्यावर विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. मयतास आई, वडील, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. मयतास पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणले असून पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्याचे काम सुरू आहे.

  • vignaharta
  • advt atharva hospital
  • Online Add I RGB
  • new ad
  • advt tsh 1

पिपळगाव तरुणाचा भडगावं रस्त्यावर विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे वृत्त असे की पिपळगाव हरेशवर येथील राजेश कडुबा ढाकरे व वय 29 यांनी आज दुपारी दु 2 वा वाजेच्या सुमारास भडगाव रस्त्यावर विष पिऊन आत्महत्या केली असून नेमके वरील घटनास्थळीचे ठिकाण चर्चेत बोलले जात आहे मात्र आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही.