एरंडोल, क्राईम

पारोळा येथे प्रवासी महिलेची सोन्याची पोत लंपास

शेअर करा !

Purse robbary in jalgaon

एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल-पारोळा दरम्यान खाजगी बसमध्ये अज्ञात महिलेने 48 हजार किंमतीची सोन्याची पोत लांबवल्याची घटना घडली. याप्रकरणी एरंडोल पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • FB IMG 1572779226384
  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

याबाबत माहिती अशी की, पारोळा ते एरंडोल चालणाऱ्या खाजगी बसमध्ये बहादरपूर येथील नूतन मनोज बडगुजर या एरंडोल येथे येत असताना त्यांच्या शेजारी बसलेल्या अज्ञात महिलेने त्यांची नजर चुकवून त्यांच्या जवळ असलेल्या पर्समधील पर्स चोरली. सदर घटना नूतन बडगुजर यांना एरंडोल येथे उतरल्यावर समजली असता त्यांनी एरंडोल पोलिस स्टेशनला धाव घेवून अज्ञात महिले विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चोरीस गेलेल्या पर्समध्ये 23 ग्रॅम वजनाची 48 हजार रुपये किमतीची जुनी वापराची पोत 2000 हजार रोख व महत्वाची कागत पत्र चोरीस गेले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुडील तपास पो.हे.कॉ.सुनील लोहार करीत आहेत.