क्राईम, जामनेर

पाळधी येथे गावठी दारू अड्ड्यावर पहूर पोलीसांची धाड

शेअर करा !

paldhi news

पहुर, ता जामनेर (प्रतिनिधी)। येथून जवळ असलेल्या पाळधी येथे गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांनी दुसऱ्या दिवशी धाड टाकून दारू बनविण्याचा कच्चा रसायन व गावठी दारू जप्त करण्यात आला.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

सविस्तर माहिती अशी की, नव्याने रुजू झालेले सपोनि राकेश सिंग परदेशी यांनी पदभार स्वीकारतात आज सकाळी पाळधी गावाजवळ दुसऱ्या दिवशी हातभट्टी अड्ड्यावर धाड टाकून त्या ठिकाणी असलेला आरोपी विलास नामदेव पाटील पोलिसांना पाहून त्या ठिकाणाहून फरार झाला. या आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याठिकाणी कच्चे रसायन पक्की बनवलेली हातभट्टीची दारूची कॅन असलेली आज भट्टी दारू असे एकूण 5 हजार रुपयाचा किमती चा माल रंगेहात पकडण्यात आला.

या पथकात सपोनि राकेशसिंग परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र परदेशी किरण शिंपी अनिल देवरे या पथकाने ही धडक कारवाई करून अवैध धंदे विरोधात जोरदार मोहीम उघडली असून पदभार स्वीकारताना आज सकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी यांनी दुसऱ्या दिवशी कामाची धडक कारवाई दाखवून दिली. या त्यांच्या कारवाईमुळे अवैध धंद्या करणाऱ्यांमध्ये खळबळ माजली असून नवनिर्वाचित सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी यांच्या या कामगिरीमुळे नागरिकांनी कौतुक केले असून पहूर पोलिस स्टेशनला प्रथमच सिंघम अधिकारी मिळाल्यामुळे कायमस्वरूपी अवैध धंदे बंद होतील अशी आशा नागरिक करीत आहे.