क्रीडा, राज्य

ॲडलेड कसोटी सामन्यात पाकचा पराभव

शेअर करा !

 

मुंबई वृत्तसंस्था । अ‍ॅडलेड कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला १ डाव आणि ४८ धावांनी पराभूत केले. पहिल्या डावात ५८९ धावांपर्यंत मजल करत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पहिला डाव ३०२ धावांवर संपवला आहे. यानंतर, ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा दुसरा डाव २३९ धावांनी जिंकत मालिका २-१ने जिंकत जिंकली.

  • Sulax 1
  • spot sanction insta
  • advt tsh flats

सलामीवीर डेव्हि़ड वॉर्नरने आपली अ‍ॅशेस मालिकेतली खराब कामगिरी बाजूला ठेवत दमदार पुनरागमन केले. पहिल्या डावात वॉर्नरने नाबाद त्रिशतक झळकावले. कसोटी कारकिर्दीतलं त्याचं हे पहिलं त्रिशतक ठरले आहे. त्याने नाबाद ३३५ धावांची खेळी केली, त्याला मार्नस लाबुशेनने १६२ धावा करत भक्कम साथ दिली. पहिल्या डावात शाहिन आफ्रिदीचा अपवाद वगळता एकाही पाकिस्तानी गोलंदाजाला यश मिळाले नाही. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानची पहिल्या डावात चांगलीच घरसगुंडी उडाली. मधल्या फळीत बाबर आझमच्या ९७ धावा आणि अखेरच्या फळीत फिरकीपटू यासीर शाहाने झळकावलेलं शतक या जोरावर पाकिस्तानने पहिल्या डावात ३०२ धावांपर्यंत मजल मारली. मिचेल स्टार्कने ६ बळी घेत पाकच्या संघाचं कंबरडं मोडलं.