चाळीसगाव, राजकीय

पाकच्या नावाने मते मागणाऱ्यांना सत्तेबाहेर फेका – जितेंद्र आव्हाड ( व्हिडीओ )

शेअर करा !
वाचन वेळ : 3 मिनिट

123 1

चाळीसगाव प्रतिनिधी । पाकिस्तावर हल्ला करून मते मागणाऱ्यांना आणि सत्तेची मगरूळ, पैश्यांची मस्ती आलेल्या सत्तेच्या बाहेर काढून फेका, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी आज चाळीसगाव येथे झालेल्या जाहिर सभेत केले. जळगाव मतदार संघाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ चाळीसगाव येथे दुपारी जाहीर सभा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, उमेदवार अरुणभाई गुजराथी, माजी आमदार राजीव देशमुख, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी खा. ईश्वरलाल जैन, मनीष जैन, अनिल पाटील, आदी उपस्थित होते. कवितेच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टिका राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ता यांनी चाळीसगाव येथे झालेल्या सभेत केली.

 • NO GST advt 1
 • linen B
 • मोदीची मुद्दे पे आईये
  पाकिस्तान पे आप चाहे उतना बोलिये, पाकिस्तान पे आप चाहे उतना बोलिये,
  लेकीन चुनाव भारत में है। उसकी भी तो कभी पहेल किजीए । मोदीजी मुद्दे पे आईये ।
 • आप जब जी चाहिए पाकिस्तान पे बम फेंकिए । चाहे उसके लिए मंहंगा राफेल लेके जाईए ।
  लेकीन राफेल की किंमत जनता को बताईऐ। मोदी मुद्दे पे आईए
 • 15 लाख का सुट । 15 लाख का सुट । बन थाकने पहनिए ।
  लेकीन गरीबोंका चड्डी बनीयान का तो इंतजाम किजीए । मोदी जी मुद्दे पे आईए

तब लढे थे गोरे से अब लढेंगे चोरो से…
ते पुढे म्हणले की, पोलीसांनी आपले कर्तव्य पार पडा असे सांगत स्थानिक पोलीसांना सांगितले. त्यामुळे गुन्हे दाखल होणे यांना आम्ही घाबरत नाही असे सांगून भाषणाला सुरूवात केली. आजच्या निवडणूकीत मुख्य मुद्द्यावर पंतप्रधान मोदी बोलत नाही. 2014च्या लोकसभा निवडणूकीत ज्या काही घोषण केल्या त्यावेळी आशेची होती, उम्मेदीची होती किंवा काहीतरी बदल होईल असे वाटून लोकांनी भरभरून मते दिली. मात्र आज नरेंद्र मोदी मुख्य मुद्द्यावर बोलतच नाही.

ते पुढे म्हणाले की, मोदींचे प्रत्येक भाषण हुंकार घालण्याचे काम करते. १५ लाख प्रत्येकाच्या खात्यात देईल असे सांगितले होते. त्यांनी स्वप्न दाखविली. हे एक मृगजळ आहे. मोदीजी देशात भाषण देत आहेत. कुठलाही पंतप्रधान आपल्या कामांचा आलेख सांगतो. पाकिस्तानच्या नावाने मते मागायची. नवाज मालिकांच्या घरी बिर्याणी खायची अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी भाषणातून बोलताना दिली. आजीचे आणि बापाचे हत्या पाहिलेल्या राहुल गांधींना टेरररीस्ट समजता. लोकसभेची निवडणूक दिशा बदलविण्याची काम करीत आहे. यानिवडणुकीद्वारे लोकशाहीचे भविष्य ठरविण्याचे काम करणार नाही. पोलीस बीजेपीचे मंडलिक झाल्यासारखी वागत आहे. बारामती माझ्या हातात द्या असे म्हणणारे गिरीश महाजन यांच्यावर टीका करत त्यांची पैशांची मस्ती उतरवा, उतरवा असे आवाहन आव्हाड यांनी उपस्थितांना केले. काँग्रेसने काय केले हे मोदी सांगतात. मात्र त्यांना काँग्रेस काय आहे हे माहित नाही. आम्ही गांधींचे चेले आहोत. हिंमत असेल तर गोळवलकरांच्या नावाने मते मागा. आधुनिक काळातले वाल्मिकी आहेत. रामाचा वनवास १४ वर्षांचा असतो मात्र आता साडेचार वर्षांचा वनवास आहे. मंदिर वही बनायेंगे, पण केव्हा हे कुणी न सांगता आज श्रीरामाच्या नावाने मते मागत असल्याची टिका यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केली.

Leave a Comment

Your email address will not be published.