जळगाव, सामाजिक

युवा जागर-महाराष्ट्रावर बोलू काही कार्यक्रमांतर्गत वक्तृत्व स्पर्धा व युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन

शेअर करा !
yuva
 

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यातील युवांच्या सर्वांगीण विकासाकरीता राज्यात युवा संसद हा कार्यक्रम शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांची टॅगलाईन युवा जागर- महाराष्ट्रावर बोलू काही अशी आहे. राष्ट्रीय व राज्य निर्माणामध्ये युवांचा सहभाग वाढविणे, युवांमध्ये नेतृत्व गुणाचा विकास करणे, युवांच्या सुप्त गुणाना वाव देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

  • spot sanction insta
  • Sulax 1
  • advt tsh flats

जिल्हास्तर युवा संसद 22 ऑगस्ट रोजी सकाळी 9.00 वाजता श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, स्टेट बँक ऑफ इंडिया समोर, जळगाव, कनिष्ठ स्तरावर व तालुकास्तरावर 15 विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत, युवक/युवती कडून मांडण्यात आलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने विषयाचे सखोल ज्ञान, मुद्दे मांउणी, वक्तृत्व कला, सादरीकरण व प्रभाव अशा एकूण पाच बाबींसाठी प्रत्येकी 20 गुणाप्रमाणे एकूण 100 गुणाचे मुल्यांकन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात युवा संसद हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सर्व कनिष्ठ महाविद्यालय, तसेच शासकीय व अनुदानित आश्रमशाळा/माध्यमिक शाळा ज्यांना 11 वी/12 वीचे वर्ग संलग्न आहेत. समाजकल्याण अंतर्गत येणाऱ्या माध्यमिक शासकीय व अनुदानित आश्रमशाळा /माध्यमिक शाळा ज्यांना 11 वी 12 वीचे वर्ग संलग्न आहेत. त्यांचे 11 वी 12 वीचे युवक/युवती यांनी सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी संयुक्तरित्या केले आहे.

या उपक्रमात 15 ते 19 या वयोगटातील सर्व कनिष्ठ महाविद्यालय तसेच शासकीय अनुदानित आश्रमशाळा/माध्यमिक विद्यालय ज्यांना 11 वी 12 वीचे वर्ग संलग्न आहेत. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक/प्राचार्य यांच्या सभेचे आयोजन शिक्षणाधिकारी माध्यमिक, जळगाव व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जळगाव यांचेमार्फत जिल्हा क्रीडा संकूल येथे आयोजित करण्यात आले होते.

वक्तृत्व स्पर्धा व युवा संसद कार्यक्रमाचे मुख्यत्वे तीनस्तर असून यात प्रथम स्तर (कनिष्ठ स्तर) 15 ते 19 वयोगटातील 11 वी 12 वीचे वर्ग संलग्न आहेत. द्वितीयस्तर (तालुका स्तर/गटस्तर) यामध्ये 20 किंवा त्यापेक्षा जास्त किंवा कमी कनिष्ठ महाविद्यालयाचा एक गट याप्रमाणे 14 गट करण्यात आलेले आहेत. तृतीय स्तर (जिल्हास्तर युवा संसद कार्यक्रम :- जिल्हास्तरावर तालुका/गट स्तरावरील प्रथम तीन क्रमांक प्राप्त झालेल्या युवांचा सहभाग.

जिल्हास्तरावर सर्वोत्कृष्ठ तीन युवांना प्रथम रूपये 10 हजार, द्वितीय रूपये 7 हजार व तृतीय रुपये 5 हजार याप्रमाणे शासकडून निधी प्राप्त झाल्यावर देण्यात येणाऱ्या जिल्हास्तर युवा संसद कार्यक्रम, कनिष्ठ स्तरावर व तालुकास्तरावर, युवक/युवती कडून मांडण्यात आलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने स्पर्धा व गुणांकन असे आहेत.