क्राईम, जळगाव, धरणगाव

डोक्यात दगड पडल्याने तरूणाचा मृत्यू

शेअर करा !

Crime

जळगाव प्रतिनिधी | धरणगाव तालुक्यातील पाळधी शिवारात शेतातील विहिरीत काम करत असताना डोक्यावर दगड पडल्याने 32 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत जिल्हा पेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

  • spot sanction insta
  • Sulax 1
  • advt tsh flats

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बापू धनराज वडर (वय-32) रा. पाळधी ता.धरणगाव हे आज दुपारी पाळधी शिवारातील शेतात विहिरीचे काम करत असताना डोक्यावर दगड पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. साडेचार वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वैद्यकिय अधिकारी डॉ. कळसकर यांनी मृत घोषीत केले. याबाबत जिल्हा पेठ पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.