क्राईम, पारोळा

म्हसवे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, एक जखमी

शेअर करा !

accident

 

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसवे गावाजवळ धुळेकडून जळगाव येथे लग्नासाठी जाणाऱ्या मोटार सायकलस्वारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यु तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली आहे. अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार आहे.

  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels
  • FB IMG 1572779226384

याबाबत अधिक माहिती अशी की, सलमान अफजल खान पठाण (वय-27 रा.लाला सरदार नगर देवपूर, धुळे) यांच्या जागीच मृत्यु झाला आहे. तर मूसबीर शेख मुस्ताक (वय-26 रा. देवपूर धुळे) हे गंभीर जखमी झाले आहे. हे दोघे आज लग्नासाठी जळगाव येथे जात होत. मात्र म्हसवे गावाजवळ अज्ञात वाहनाने धडक देवून फरार झाला आहे. जखमींवर कुटीर रुग्णालय येथे औषध उपचार करण्यात येऊन अधिक उपचारार्थ धुळे येथे हलविण्यात आले आहे. घटनास्थळावरून धडक देणारे अज्ञात वाहन चालक फरार झाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून तात्काळ महामार्गावरील खड्डे बुजण्याची मागणी लावून धरली होती. पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून वाहतूक सुरळीत केली आहे. उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे काम हे सुरू होते.