बोदवड, सामाजिक

अदोनय फाउंडेशनतर्फे एक दिवसीय रक्तगट तपासणी शिबीर

शेअर करा !

WhatsApp Image 2019 09 22 at 7.17.37 PM

बोदवड, प्रतिनिधी |  अदोनाय फाउंडेशनतर्फे एक दिवसीय रक्तगट तपासणी शिबीराचे महाराष्ट्र बायबल कॉलेज नाडगाव बोदवड येथे आज दिनांक २२ संप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले  होते.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

या शिबिरात रक्तगट तपासणी व आरोग्य शिबिरात ‘क्लिंनलीनेस, पर्सनल हायनीज व न्यूट्रिशन’ या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. नाडगाव व बोदवड तालुक्यातील लोकांसाठी हे मोफत रक्तगट तपासणी आणि मार्ग्दशन शिबिर घेण्यात आले.  ग्रामस्थांची समाजसेवा व्हावी या उद्देशाने हे मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद या शिबिराला मिळाला. अदोनय फाउंडेशनचे प्रमुख अध्यक्ष डॉ. सुहास बाळू दांडगे (प्रेरणा क्लिनिक लैबोरेटरी, भुसावळ), डॉ. पवन सरोदे  व सहकारी यांच्यासह महाराष्ट्र बायबल कॉलेज प्रमुख रेव्ह संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.