जळगाव, सामाजिक

रविवारी स्वामी समर्थ केंद्रातर्फ सर्व जाती धर्मीय वधू-वर परिचय मेळावा

शेअर करा !

vivahaaa

जळगाव  प्रतिनिधी | अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा विवाह संस्कार विभागामार्फत येत्या रविवार  १० नोव्हेंबरला जळगाव येथे सर्व जाती व धर्मीय  निःशुल्क  वधू-वर परिचय मेळावा होत आहे. पूर्व नोंदणीसाठी जवळच्या दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील प्रतिनिधींशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels
  • FB IMG 1572779226384

विवाह संस्कार विभागातर्फे सर्व जाती धर्मीय वधू-वर मेळाव्याचे आयोजन श्री स्वामी समर्थ जानकीनगर केंद्र येथे रविवार १० नोव्हेंबर रोजी दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. तरी सर्व विवाह इच्छुक उपवर-वधूनी आणि त्यांच्या पालकांनी उपस्थित राहावे आणि आपल्या पाल्याला सुयोग्य जोडीदार मिळविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच मेळाव्याला सोबत येताना पुढील कागदपत्रे नावनोंदणीसाठी आणावी वधू – वराचा बायोडाटा,
पासपोर्ट साईझ फोटो-१ , आधार कार्ड, ड्राइविंग लाईसन्स, किंवा अन्य कोणतेही ओळखपत्राची झेरॉक्स आणणे आवश्यक आहे.सर्व वधू वर आणि त्यांच्या पालकांना मेळाव्यात प्रवेश तसेच वधू वर नावनोंदणीही विनामूल्य आहे.