ट्रेंडींग, व्हायरल मसाला

आता अ‍ॅपवरून ट्रॅक्टर भाड्याने मागविता येणार

शेअर करा !

CHC Farm Machinery app

नवी दिल्ली वृत्तसंस्था । कृषी मंत्रालयाने आता एक स्वतंत्र अ‍ॅप सादर केले असून याच्या मदतीने शेतकरी ट्रॅक्टर भाड्याने भागवू शकणार आहेत.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

ओला आणि उबरसारख्या अ‍ॅग्रिगेटर्समुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदी आल्याचे प्रतिपादन अलीकडेच केल्याने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्याने त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. सोशल मीडियात त्यांची खूप खिल्लीदेखील उडविण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमिवर, केंद्रीय कृषी मंत्रालयाने सीएचसी फार्म मशिनरी या नावाने नवीन अ‍ॅप सादर केले आहे. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअवरून इन्स्टॉल करावे लागेल. एकदा हे इन्स्टॉल केले की शेतकर्‍याला यात आपला मोबाईल क्रमांकासह माहिती देऊन नोंदणी करावी लागेल. यानंतर त्याच्यासमोर डॅशबोर्ड उघडेल. यात विविध कृषी उपकरणे भाड्याने मिळण्याबाबतची माहिती असेल. अर्थात, शेतकरी त्याच्या जवळ असणार्‍या कस्टम हायरींग सेंटर म्हणजी सीएचसीमधून आपल्याला हवे असणारे उपकरण भाड्याने मागवू शकतो. यात ट्रॅक्टरसह २५ विविध कृषी उपकरणे भाड्याने मिळण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यात थ्रेशर व ट्रेलसह अन्य उपकरणांचा समावेश आहे. हे अ‍ॅप मराठीसह देशातील बारा महत्वाच्या भाषांमध्ये उपलब्ध असल्याने याला वापरण्यात काहीही अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन कृषी मंत्रालयातर्फे करण्यात आले आहे.

सीएचसी फार्म मशिनरी डाऊनलोड लिंक :

https://play.google.com/store/apps/details?id=app.chcagrimachinery.com.chcagrimachinery&hl=en_IN