यावल, राजकीय, सामाजिक

हिंगोणा येथे ना. हरिभाऊ जावळे यांच्याहस्ते लोकसभागृह इमारतीचे भूमिपूजन

शेअर करा !

na. haribhau javale

यावल प्रातिनिधी । तालुक्यातील हिंगोणा येथे लोकसभागृह इमारतीसाठी ना.आ. हरीभाऊ जावळे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत ७ लाख रु. मंजूर झाले असून ना. हरिभाऊ जावळे यांच्याहस्ते दि.10 सप्टेंबर रोजी या जागेचे भूमिपूजन करण्यात आले आहे.

FB IMG 1572779226384

 

याबाबत अधिक माहिती अशी की, हिंगोणा येथील बसस्थानकाचे नवीन प्रवाशी निवाऱ्याचे देखील सुरू असलेले बांधकाम हे शेवटच्या टप्प्यात आले आहे. ना. हरीभाऊ जावळे यांच्या प्रयत्नांनी रावेर व यावल तालुक्यात विविध पातळीवर मंजुर झालेली विकासकामे प्रगतीपथावर आहे. यावेळी हिंगोणा येथिल प्रभारी सरपंच महेश राणे, सावखेडा हिंगोणा गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सविता भालेराव, यावल पं.स. सदस्य योगेश भंगाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षल पाटील, भागवत साहेब, भरत पाटील, विजय पाटील, राजेद्र महाजन, बाळु कुरकुरे, सागर महाजन, बबलु भालेराव, भाजपाचे सक्रीय युवा कार्यकर्ते अतुल भालेराव, ललीत महाजन, पितांबर वायकोळे, शेखर जावळे, रविंद्र पाटील, पं.स.माजी सुर्यभान तायडे, सदानंद पाटील, राजाराम लोंढे, नारायण जंगले, घनश्याम गाजरे यांच्यासह मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.