जळगाव, शिक्षण

विद्यापीठात जलसंजीवनी श्रमदान शिबिराचे आयोजन

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात २१ ते २५ मे दरम्यान विद्यापीठात विद्यापीठस्तरीय जलसंजीवनी श्रमदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Akshay Trutiya

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाच्या वतीने हे जलसंजीवनी श्रमदान शिबिर होणार आहे. यासाठी सेवावर्धिनी संस्था, पुणे यांचे सहकार्य मिळणार आहे. नाला बांध, बंधारे बांधण्यासाठी व जास्तीत जास्त पाणी अडविणे, जिरवणे तसेच क्रीडा संकुलालगतचा तलाव खोलीकरण, वृक्षारोपण, विहीर पूर्नभरण अशी कामे होतील. शिबिरासाठी २० समित्यांचे गठण करण्यात आले आहे. कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या मार्गदर्शनात हे शिबिर होत आहे. व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील हे शिबिराचे अध्यक्ष आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published.