क्रीडा

नाणेफेक जिंकून न्यूझिलंडची प्रथम फलंदाजी

शेअर करा !

मॅन्चेस्टर वृत्तसंस्था । विश्‍वचषकातील उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात आज भारताची लढत न्यूझिलंडविरूध्द होत असून यात किवीजने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

भारतीय संघाने एक अपवाद वगळता सर्व साखळी सामने जिंकून अतिशय धडाकेबाज पध्दतीत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे न्यूझिलंडचा संघदेखील बलवान असल्यामुळे याला कमी लेखून चालणार नाही.

ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर पहिली उपांत्य फेरी रंगणार असून यात न्यूझिलंडने नाणेफ किवीजच्या संघाची गोलंदाजी अतिशय धारदार असून फलंदाजी तुलनेत थोडी कमकुवत आहे. फलंदाजीची मदार केन विल्यमसनवर जास्त प्रमाणात आहे. भारताचा संघ संतुलीन आहे. मात्र न्यूझिलंडच्या धारदार मार्‍यासमोर भारतीय फलंदाजांचा कस लागणार आहे. यामुळे हा सामना चुरशीचा होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.