जळगाव, सामाजिक

नवरात्रोत्सवात खवैय्या जळगावकरांना भुरळ घालणारा ‘वृजवासी चाटवाला’ (व्हिडीओ)

शेअर करा !

mathurawasi rabadi

जळगाव, प्रतिनिधी । नवरात्रोत्सवात नऊ दिवस वृंदावनचा पेढा, रबडी आणि लस्सीसाठी प्रसिध्द असलेले वृंदावन वासी विजय मित्तल यांच्या ‘वृजवासी चाटवाला’ या दुकानाची जळगावकर नवरात्रीत आतुरतेने वाट बघत असतात.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

नवरात्रोत्सवाचे नऊ दिवस विजयजी व त्यांचे सहकारी बच्चूसिंग सराफ बाजारातील सिल्वर पॅलेससमोर आपले दुकान लावतात. या दुकानावर मथुरेचा प्रसिध्द पेढा, रबडी, केसर रबडी आणि लस्सी जळगावकरांना येथे अल्पदारात उपलब्ध असते. गेल्या २७ वर्षांपासून विजयजी हे दुकान जळगावकरांच्या सेवेसाठी लावत असतात. मथुरेची रबडी आणि पेढा हे संपूर्ण देशात प्रसिध्द आहेत. थेट नवरात्रोत्सवात भाविकांसह जळगावातील नागरिकांना मथुरेचा पेढा व राबडीची चव चाखायला मिळावी, यासाठी खास ते परंपरेने येथे हे दुकान लावत आहेत. या दुकानाची महती आणि माहिती जाणून असलेले खवैय्ये जळगावकर न चुकता याकाळात या दुकानावर वर्ष भरातून एकदाच मिळणारे हे पदार्थ खाण्यासाठी हजेरी लावत असतात.