क्राईम, पाचोरा

नांद्रा येथे खदानीत बुडून तरूणाचा मृत्यू (व्हिडीओ)

शेअर करा !

nandra pachora

नांद्रा प्रतिनिधी । येथून जवळ असलेल्या आसनखेडा रोडवरील खदाणीत पोहण्यासाठी गेलेल्या नांद्रा येथील तरूणाचा पाय घसरून बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घडली.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

याबाबत माहिती अशी की, ईश्वर सुभाष मोरे (वय- 42) रा. नांद्रा ता. पाचोरा हा मोलमजूरी करून आई व दोन मुलांचा सांभाळ करीत होता. आज दुपारी आई रजूबाई मोरे आणि पाच वर्षाचा मुलगा यांच्यासोबत आसनखेडारोडवरील खदाणीजवळ आंघोळ करण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याची आई रजूबाई किनाऱ्यावर धुणं धोत होती. दरम्यान ईश्वर मोरे पाण्यात पोहत असतांना अचानक पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यावेळी रजूबाई यांनी आरडाओरड करून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. मयत ईश्वरच्या पश्चात आई व दोन मुले असा परीवार आहे. घटनस्थळी पोलीस दाखल झालेले नाही.