क्राईम, जळगाव, पाचोरा

नाचणखेडा येथील तरूणाचा विष घेवून आत्महत्या

शेअर करा !

Crime

जळगाव प्रतिनिधी । शेतात मोजमजूरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या तरूण शेतकऱ्याने कर्जबाजारीच्या नैराश्येतून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. याबाबत शहर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

  • advt tsh flats
  • Sulax 1

मिळालेल्या माहितीनुसार, सोनुसिंग रामसिंग पाटील (वय-34) रा. नाचणखेडा ता.पाचोरा यांचे नाचणखेडा शिवारात शेत असून शेतातील नापिकीमुळे व कर्जबाजारीला कंटाळून राहत्या घरात कुणीही नसतांना दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास विष घेतले. थोड्या वेळानंतर त्यांना अस्वस्थ जाणवू लागल्याने 10 वर्षांचा मुलगाच्या लक्षात आल्यानंतर त्याने गल्लीत आराडाओरड केल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. यावेळी पत्नी व आई शेतात कामासाठी गेले होते. नातेवाईकांनी तातडीने खासगी वाहनाने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. सायंकाळी 5.45 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यात मृत्यू झाला. मयताच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परीवार आहे. याप्रकरणी वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रविण पाटील यांच्या खबरीवरून शहर पेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.