मनोरंजन, राजकीय, राज्य

‘माय नेम इज रागा’ लवकरच होणार प्रदर्शित

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट
rahul gandhi biopic my name is raga movie
 

मुंबई (प्रतिनिधी) ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या जीवनावरील ‘माय नेम इज रागा’ हा सिनेमादेखील लवकरच प्रदर्शित होत आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीदरम्यान या सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला होता.

  • vignaharta
  • new ad
  • advt tsh 1
  • Online Add I RGB
  • advt atharva hospital

 

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान, निवडणूक आयोगाने ‘पीएम नरेंद्र मोदी’ या सिनेमासह ‘माय नेम इज रागा’चे ही प्रदर्शन लोकसभा निवडणूक काळात थांबवले होते. परंतू निवडणूक आयोगापेक्षा राहुल गांधींच्या समर्थकांचा या सिनेमाला जास्त विरोध होता असे दिग्दर्शकाचे म्हणणे आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक रुपेश पॉल यांनी याबाबत माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा सिनेमा 24 मे रोजी प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर लगेचच आता राहुल गांधींच्या जीवनावरील बायोपिक देखील प्रदर्शित होत आहे.