क्राईम, जळगाव

दारूच्या नशेत सख्ख्या भावाची क्रूर हत्या; जळगावातील धक्कादायक घटना

शेअर करा !
khunacha aaropi
आरोपी जय मरसाळे

जळगाव प्रतिनिधी । दारूच्या नशेत असतांना झालेल्या किरकोळ वादातून एका नराधमाने आपल्या सख्ख्या लहान भावाची क्रूर हत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

  • FB IMG 1572779226384
  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, प्रल्हाद तानकू मरसाळे (रा. पिंप्रळा, हुडको) यांना तीन मुले आहेत. मोठा मुलगा विजय प्रल्हाद मरसाळे हा जैनाबाद परिसरात आपल्या कुटुंबासह राहतो. तर जय प्रल्हाद मरसाळे वय ३५ आणि दीपक प्रल्हाद मरसाळे वय २५ हे पिंप्राळा हुडको परिसरातील मातंग वाड्यात एकत्र राहतात. त्यांचा घराच्या बाजूला प्रल्हाद मरसाळे भाड्याच्या घरात राहतात. दरम्यान, शुक्रवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास जय आणि दिपक यांनी घरी सोबत जेवण केले. जय मारसाळे याला दारू पिण्याची सवय असल्याने त्याने काल रात्रीदेखील दारू पिलेली होती. दरम्यान दोघा भावांमध्ये किरकोळ वाद सुरू होता. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी प्रल्हाद मरसाळे याने आपला लहान भाऊ दीपक यांच्या डोक्याला कोणत्यातरी वस्तूने डोक्याला मारहाण करून त्याला पंख्याला फाशी घेतल्याचे दर्शविले. सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास वडील प्रल्हाद यांना आरोपी जय मारसाळे याने आरडाओरड करून भावाने आत्महत्या केल्याचे सांगत जागी केले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिसाचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी घरामध्ये डोक्यातून मोठया प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. यामुळे ही आत्महत्या नव्हे तर खून असल्याचे प्रथमदर्शनीच दिसून आले. परिणामी पोलिसांनी जय मरसाळे याला सकाळी ७ वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले असून त्याने रात्रीचा घटनाक्रम सांगितला. त्याच्या विरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. सख्ख्या भावानेच खून केल्याची घटना समोर आल्याने जळगावात खळबळ उडाली आहे.