क्राईम, भुसावळ

भुसावळात महिलेचा खून

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट
मृतदेह आढळलेल्या ठिकाणाची पाहणी करतांना अप्पर पोलीस अधिक्षक लोहीत मतानी व अन्य अधिकारी.

भुसावळ प्रतिनिधी । तीन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह आज आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

  • advt tsh 1
  • new ad
  • vignaharta
  • Online Add I RGB
  • advt atharva hospital

याबाबत माहिती अशी की, सरलाबाई अशोक भंडारकर (रा. ६०, भुसावळ) ही महिला घरातून तीन दिवसांपासून बेपत्ता झालेली होती. यामुळे शहर पोलीस स्थानकात मिसींगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आज सायंकाळी झेडटीसीजवळच्या गेट क्रमांक जवळच्या बाजूला या महिलेचा मृतदेह आढळून आला असून तिची अत्यंत निर्दयपणे हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. याबाबत शहर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. दरम्यान, अप्पर पोलीस अधिक्षक लोहित मतानी, डीवायएसपी गजानन राठोड, पोलीस निरिक्षक बाळासाहेब ठुबे आदी अधिकार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी केली.