क्राईम, जामनेर

महिलेचा डोक्यात लाकडी दांडा मारून खून; आरोप अटकेत

शेअर करा !

पहुर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथून जवळ असलेल्या पिंपळगाव कमानी तांडा येथे क्षुल्लक कारणावरून वृद्ध महिलेच्या डोक्यात लाकडी दांडा मारल्याने महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज घडली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

  • Sulax 1
  • advt tsh flats
  • spot sanction insta

याबाबत माहिती अशी की पिंपळगाव कमानी तांडा येथील गुजरात सावजी राठोड याने क्षुल्लक कारणावरून शांताबाई मदन चव्हाण (वय ६०) या वृद्ध महिलेच्या डोक्यात लाकडी दांडा मारला. गुरुवारी सकाळी आठ वाजता आंगणात बैल गाडी सोडण्याच्या कारणावरून शांताबाई मदन चव्हाण व भोजराज सावजी राठोड यांच्यात जोरदार भांडण झाले. यातच त्याने महिलेच्या डोक्यात दांडा मारला. यादरम्यान महिला जमिनीवर कोसळली रक्तस्राव मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने शांताबाई चव्हाण यांना तात्काळ पहूर ग्रामीण रुग्णालय उपचारार्थ दाखल केले. येथे प्राथमिक उपचार करून जामनेर येथे उपजिल्हा रुग्णालय नेत असताना शांताबाई चव्हाण यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पहूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश काळे व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. आरोपी भोजराज सावजी राठोड त्याला तात्काळ अटक करून याच्या विरोधात पहूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश काळे हे करीत आहेत.

दरम्यान, आरोपीने स्वतः डोक्यात मारून घेतल्याने त्याला दवाखान्यात अ‍ॅडमिट करण्यात आले. येथेच त्याला संबंधीत महिला मृत झाल्याची माहिती मिळताच त्याने दवाखान्यातून पळ काढला. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश काळे यांनी पोलिस अधीक्षक डॉक्टर पंजाबराव अंगले यांच्याशी चर्चा करून जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या सहकार्याने आरोपीला सापळा रचून जळगाव येथे पकडले.