क्राईम, रावेर, व्हायरल मसाला

मुले पळवून नेण्याची निव्वळ अफवा – पो.नि. रामदास वाकोडे

शेअर करा !

ramdas vakode

रावेर प्रतिनिधी । शाळेतील मुले पळवुन नेणारी टोळी शहरात आली असून लहान मुले व शाळेतील मुले बळजबरीने उचलून नेण्याची अफवा येथील परिसरात पसरली आहे. अशी कोणतीही मुले चोरुन नेणारी टोळी आली नसून ही निव्वळ अफवा असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी दिली आहे.

  • advt tsh 1
  • advt atharva hospital
  • Online Add I RGB

याबाबत माहिती अशी की, येथील पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी रावेर पोलिस स्टेशन हद्दीतील नागरिकांना अवाहन केले आहे की, मुले पळवुन नेले आहे, मुले पळविणारी टोळी आली आहे, मोटार सायकलवर जबरीने पळवून नेले आहे, अशा प्रकारच्या अफवा व्हाट्सअपद्वारे पसरविल्या जात आहेत. त्यामुळे पालकवर्ग तसेच लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण नाहक निर्माण होत आहे. अफवा पसरविणारे मेसेज् कोणीही ग्रुपवर टाकू नये, किंवा मेसेज् आल्यास त्वरीत पोलीसांशी संपर्क साधावा. तसेच कोणावर ही विश्वास ठेवू नये, अश्या स्वरूपाच्या अफवा पसरवून इतरांना घाबरवू नये, असे अवाहन यावेळी करण्या आले आहे.