क्राईम, राज्य

दिराकडून वहिनी व पुतण्याची हत्या

शेअर करा !

नवी मुंबई (वृत्तसंस्था) कामोठे सेक्टर-३४मधील एकदंत सोसायटीत राहणाऱ्या विवाहितेची व तिच्या दोन वर्षीय मुलाची मोठ्या दिरानेच हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

  • FB IMG 1572779226384
  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

 

सुरेश चव्हाण असे या दिराचे नाव असून कामोठे पोलिसांनी त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. आरोपी सुरेश हा काहीच कामधंदा करत नसल्याने त्याला कुटुंबीयांनी वर्षभरापूर्वी घरातून बाहेर काढले होते. याच रागातुन त्याने हे दुहेरी हत्याकांड झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. सोमवारी लहान भाऊ योगेश हा कामावर गेल्यानंतर सुरेश घरी गेला होता. यावेळी त्याने जयश्रीसोबत त्याला घराबाहेर काढल्याच्या रागातून वाद घालून रागाच्या भरात जयश्री व पुतण्या अविनाश या दोघांचा गळा आवळून हत्या केली. दोघांची हत्या केल्यानंतर आरोपी सुरेश जयश्री व अविनाश या दोघांच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला. रात्री १० वाजण्याच्या सुमारास योगेश कामावरून घरी आल्यानंतर घरात पत्नी जयश्री व मुलगा अविनाश हे दोघे मृतावस्थेत पडल्याचे त्याच्या निदर्शस आले.