क्रीडा, राजकीय, राज्य, राष्ट्रीय

मोहम्मद कैफने पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सुनावले

शेअर करा !

Mohammad Kaif

नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. इम्रान खान हे एक दिग्गज क्रिकेटपटू होते, मात्र आता ते ‘पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांच्या हातातील बाहुले बनले’ असल्याची टिका कैफ याने केली आहे.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

याबाबत अधिक माहिती अशी की, संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीच्या ७४ व्या सत्रात इम्रान खान यांचे भाषण झाले. या भाषणावर जगभरातून टीका करण्यात येत असून माजी कर्णधार सौरभ गांगुली यानेही इम्रान खान यांच्या संयुक्त राष्ट्रांतील भाषणावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. हे भाषण म्हणजे निव्वळ बडबड असल्याचे गांगुलीने म्हटले होते. ‘ज्याला संपूर्ण जग ओळखते, तो हा क्रिकेटपटू नाही’, असा शब्दांत गांगुलीने इम्रान खान यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.

इम्रान खान यांना उद्देशून कैफ म्हणतो, ‘होय, तुमचा देश पाकिस्तानला दहशतवादाशी बरेच काही घेणे-देणे आहे. पाकिस्तान हा दहशवाद्यांसाठी एक सुरक्षित ठिकाण आहे. संयुक्त राष्ट्रांमधील आपले भाषण अत्यंत दुर्दैवी होते. एक महान क्रिकेटपटू लष्कर आणि दहशतवाद्यांच्या हातातले बाहुले बनले आहे.’ पाकिस्तान हा देश दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असल्याचे कैफ याने सांगत इम्रान खान यांच्या भाषणाचीही खिल्ली उडवली. इम्रान खान यांचे एक भाषण ट्विट करत कैफ याने इम्रान खान यांना चांगलेच सुनावले आहे.