भुसावळ

भुसावळात मोबाईल चोरट्यास अटक

शेअर करा !

भुसावळ प्रतिनिधी । मोबाईलसह रोकड हिसकावून पळ काढणार्‍या चोरट्याला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.

  • advt tsh 1
  • Online Add I RGB
  • advt atharva hospital

याबाबत वृत्त असे की, ११ जून रोजी दुपारी ५.०० वाजेच्या सुमारास शहरातील पुरुषोत्तम नगर गायत्री मंदिर बाजूला रोड वरून जात असतांना अज्ञात दोन जणांनी २२,०००/-रु रोख व ६०० रु की चे ६००/-रु की ची मोबाईल हे जबरीने हिसकावून घेत पोबारा केला होता. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पो स्टे भाग ५ गुरंन ३२९/२०१९ भादंवी कलम-३९२,३४ प्रमाणे दिनांक १२ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जितू एकनाथ घावरे (वय-२४,रा.वाल्मिक नगर, भुसावळ ) याने संबंधीत गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला वाल्मिक नगर भागातुन सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व पोलीस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो उप निरी दत्रायय गुलिंग, उपनिरीक्षक मनोज ठाकरे, हेकॉ सुनील जोशी, शंकर पाटील,पो ना किशोर महाजन, विकास सातदिवे,समाधान पाटील समाधान पाटील आदींनी केली असून पुढील तपास पोहेका सुनील जोशी करीत आहेत.