चोपडा, राजकीय

आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांची चोपडा तालुक्यातील गावांना भेट

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

9f91389a a891 4e2d 90a9 dd2597ee2e65

चोपडा, प्रतिनिधी |  चोपड्याचे शिवसेनेचे विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी आपल्या मतदार संघात मागील पाच वर्षांपासून चांगला जनसंपर्क ठेवला आहे. आताही त्यांनी तालुक्यातील अनेर नदीकाठावरील काही गावांना भेटी देवून लोकांशी संवाद साधला आहे. जनसंपर्क आणि विकास कामांचा जोरावर पुढील निवडनुकीत जनता त्यांच्या पाठीशी राहील, असा विश्वास गावोगाव कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

  • Online Add I RGB
  • advt atharva hospital
  • advt tsh 1
  • new ad
  • vignaharta

 

अनेक गावात लोकांचा त्यांना भरपूर प्रतिसाद लाभत आहे. त्यांनी काळ (दि.१०जुलै) अनेर काठावरील मोहिदा, अजितीसीम, विटनेर, दगडी, वढोदा, आदी गावांना भेट दिल्या. यावेळी प्रत्येक गावातील मतदारांचा एकच सूर दिसून आला की, आमदार सोनवणे हेच परत मोठ्या मतधिक्याने निवडून येतील.

या भेटी दरम्यान त्यांचा सोबत जि.प.सदस्य एस.डी.सोनवणे, हरीष पाटील, पं.स.सदस्य भरत बाविस्कर, युवासेना तालुकाप्रमुख गोपाल चौधरी, सुनिल पाटील, छोटू पाटील, देवसिंग रायसिंग, दिलीप पाटील, बाळू पाटील, कुलदीप कोळी, हुकुम पाटील, सोपान पाटील, विजय पाटील, मच्छिंद्र पाटील, सुरेश पाटील, डॉ.राहुल पाटील, भटू पाटील, जगदीश जाधव, दगा पाटील, लक्ष्मण पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.