आरोग्य, राजकीय

पूरग्रस्तांना ना. गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय मदत

शेअर करा !

purgrast madat 1

मुंबई प्रतिनिधी । जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखालील वैद्यकीय पथक सांगली व कोल्हापूर येथे पूरग्रस्तांना वैद्यकीय मदत करत आहेत.

  • spot sanction insta
  • advt tsh flats
  • Sulax 1

जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीश महाजन हे पूरग्रस्त भागात अजूनही तळ ठोकून आहेत. त्यांनी आधी पूरग्रस्तांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मदत केली. यानंतर ते वैद्यकीय सुविधा पुरवत आहेत. सांगली व कोल्हापूर येथे आलेल्या महापुरात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.तसेच योग्य प्रमाणात अन्नधान्याचा पुरवठा ही शासनामार्फत केल्या जातात. मात्र सांगलीतील महापुरानंतर रोगराई व पुरामध्ये अडकलेले लोक आजारी पडण्याची खूप मोठी शक्यता लक्षात घेऊन तज्ञ डॉक्टरांची टीम पुणे,लातूर,सोलापूर, अंबेजोगाई याठिकाणांहून त्याठिकाणी दाखल झालेली आहे. तब्बल २०० डॉक्टर त्याठिकाणी रात्रंदिवस काम करत आहेत. मिरज व कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक असणारा औषध साठा करून ठेवण्यात आलेला आहे.गेल्या पाच दिवसापासून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व शासकीय यंत्रणा यांचा निरंतर बैठका ना. गिरीश महाजन घेत आहेत. लोकांच्या समस्यांची खरी जाणीव असणारे नेते म्हणून गिरिषभाऊ यांची ख्याती आहे.ती तशीच टिकून आहे हे त्यांनी केलेल्या व करत असलेल्या कार्य वरून दिसून येत आहे. दिवस-रात्र एकत्र करून ते पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेले आहेत.