क्राईम, राज्य

‘एमडी’चा विळखा आणखी होतोय घट्ट !

शेअर करा !

md

 

मुंबई प्रतिनिधी । अंमली पदार्थाचे सेवन आणि तस्करीच्या प्रमाणात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून शहरातील तरुणाई या अंमली पदार्थाच्या विळखात सापडत असल्याचे निदर्शनास आले. पोलिस, अंमली पदार्थविरोधी पथक आणि महाराष्ट्र एटीएस यांनी गेल्या नऊ महिन्यांत जवळपास 55 कोटी रुपयांचा एमडी (मेफीड्रोन ड्रग्ज) जप्त करण्यात आले आहे.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता नवरात्रौत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने पोलिसयंत्रणा सतर्क झाल्या आहेत. कारण नवरात्रौत्सवाच्या कालावधीत ड्रग्जची मागणी प्रचंड वाढते. त्यामुळे दांडिया, नवरात्र आयोजन या ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. पोलिस कारवायांमुळे इतर अंमली पदार्थ मिळत नसल्याने एमडीचा वापर वाढल्याचे म्हटले जाते. गणेशोत्सवाच्या कालावधीत एटीएसच्या पथकाने मुंबईबाहेरून एमडी आणून ते मुंबईत वितरित करणाऱ्या तस्करांची मोठी टोळी उजेडात आणली. या कारवाईमध्ये पाच जणांना अटक करून त्यांच्याकडून तब्बल १३३ किलो एमडी हस्तगत करण्यात आले. पोलिस आणि अंमली पदार्थविरोधी पथकाने सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीत मुंबईतून २० जणांना अटक करून त्यांच्याकडून एक कोटी २९ लाख २६ हजारांचा एमडीचा साठा हस्तगत केला. मुंबईच्या वेशीवरून चारही बाजूने अंमली पदार्थ छुप्या मार्गाने मुंबईत आणले जात असल्याने पोलिसांनी नाकेबंदी केली आहे. यामुळे चरस, हेरॉइन, कोकेन यांची आवक घटल्याने ड्रग्जच्या आहारी गेलेले एमडीकडे वळले आहेत.