जळगाव, व्यापार

जळगाव मार्केट यार्ड आडत असोशिएनचा बेमुदत बंद मागे न घेण्याचा निश्चय

शेअर करा !

WhatsApp Image 2019 06 25 at 3.19.41 PM1

जळगाव (प्रतिनधी) दि जळगाव मार्केट यार्ड आडत असोशिएनच्या आज २५ जून रोजी झालेल्या सर्वसाधारण बैठकीत पुकारण्यात आलेला बंद जोपर्यत मार्केट यार्डची संरक्षक भिंत बांधण्यात येणार नाही तोपर्यत मागे न घेण्याचा निर्धार करण्यात आला.

  • spot sanction insta
  • advt tsh flats
  • Sulax 1

या बैठकीत शेतकऱ्यांकडून आलेल्या पत्राचा विचार करण्यात आला. आजही मार्केट यार्डात असलेला माल हा उघड्यावरच पडून आहे. त्याच्या सुरक्षतेची कोणतीही सुविधा पुरविण्यात आली नाही. यामुळे असोसिएशनने पुकारलेला बेमुदत बंद यापुढेही सुरु ठेवण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. याप्रसंगी असोशिएनचे अध्यक्ष बालकृष्ण बेहडे, उपाध्य शशिकांत बियाणी, सुनील तापडिया, कार्यध्यक्ष दिपक महाजन, राजेंद्र जोशी, प्रफुल दहाड आदी उपस्थित होते. दरम्यान, आज जिल्ह्यातील आडत व्यापाऱ्यांचा एकदिवसीय बंद पुकारला होता. बोदवड, अमळनेर , पारोळा , यावल , जामनेर ,धरणगाव,पाचोरा आडत असोशिएशनचा पाठिंबा दिला. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची संरक्षक भिंत विकासकाने पाडल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून येथील आडत व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे . त्यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील विविध बाजार समितीच्या आडत व्यापाऱ्यांनी आपली दुकाने आणि लिलाव आज २५ रोजी बंद ठेवून पाठिंबा दिल्याने जिल्ह्याभरात जवळपास कोट्यावधीचा व्यवहार ठप्प झाला. यात पाचोरा मार्केट आडत असोशिएशनतर्फे मार्केट एकदिवस लिलावाचे काम बंद ठेवण्यात आले होते. तसेच धरणगाव व्यापारी आडत असोसिएशन,चोपडा बाजार समिती, पारोळा बाजार समिती व्यापाऱ्यांनी, यावल बाजार समितीच्या आडत व्यापारी व जामनेर बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी खरेदी विक्री बंद ठेवून पाठिंबा दर्शवला आहे.