क्रीडा, यावल, सामाजिक

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत मनवेल आश्रमशाळेचे यश

शेअर करा !

manwel ashram shalal

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल येथील अनुदानीत आश्रमशाळेतील विद्यार्थानी तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्याने आदीवासी विद्यार्थाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

यावल तालुक्यातील हरीपुरा येथील आश्रमशाळेत यावल – रावेर या व्दितीय तालुकास्तरीय क्राडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मनवेल आश्रमशाळेतील विद्यार्थानी विविध स्पर्धेत यश संपादन केले आहे. १४ वर्ष वयोगटातील लहान गट मुलीचा तर १७ वर्ष वयोगटातील मोठा गट मुलाचा उपविजयी ठरला तर वैयक्तिक १४ वर्ष वयोगटातील १०० मीटर धावणेत दुरसिंग बारेला, ४००मिटर धावणे सुनिल बारेला, ६०० मीटर धावणे आत्माराम बारेला, ८००मीटर धावणे छोटीराम बारेला तर प्रेमलाल बारेला गोळा फेक स्पर्धेत थाळी फेक स्पर्धेत खुमसिंग बारेला, ताराचंद बारेला प्रथम क्रमांकाने यश संपादन केले.

या विद्यार्थाचे शाळेचे चेअरमन हुकूमचंद पाटील, संचालिका मिराबाई पाटील, अधिक्षक वंसत पाटील, मुख्यध्यापक संजय अलोणे, सचिन पाटील यांनी स्वागत केले तर शाळेतील उपशिक्षक राकेश महाजन, विजय चव्हाण, सचिन पाटील, मोहिम अत्तरदे यांचे मार्गदर्शन लाभले.